आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

Friday, February 25, 2011

मी अस्सल सातारकर..







मातीत जन्मतो मी ,
मातीत रमतो मी,
मातीतच विरून शेवटी ,
मातीशी इमान राखतो मी
सातारा चा - नाद नाही करायचा...
सातारा चा - नाद नाही करायचा...
रस्त्यावर पडलं कुणी चुकून तर अजुनही लोक उचलायला धावतात,
आणि आपली कितीही सुंदर असली तरी आम्हाला साध्याच पोरी भावतात ॥

मर्दानी शस्त्र आणि मर्दानी खेळ घराघरात जपले जातात,
अरे चौकातुन तर सोडाच पण महापालिकेतही त्याची प्रात्यक्षिके होतात ॥

'हाइड-आउट' कितीही स्वस्त झालं तरी 'टपरी'वर च गर्दी असेल,
आणि मिसळच्या रश्श्यावरती पिळदार मिशी तुटून पडेल ॥

Tuesday, February 22, 2011


समर्थ रामदास स्वामी
Dasbodh.JPEG
समर्थ रामदासांचे कल्पित चित्र
मूळ नावनारायण सूर्याजी ठोसर
जन्मएप्रिल, इ.स. १६०८
जांब, जालना, महाराष्ट्र
समाधी / मृत्यूइ.स. १६८२
सज्जनगड, सातारा, महाराष्ट्र
पंथ / मतसमर्थ संप्रदाय
साहित्यरचनादासबोध , मनाचे श्लोक, करुणाष्टके , आत्माराम, अनेक स्फुट रचना
भाषामराठी
कार्यभक्ती-शक्तीचा प्रसार, जनजागृती , समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना
वडीलसूर्याजी ठोसर
आईराणूबाई
प्रसिद्ध वचनजय जय रघुवीर समर्थ
तीर्थक्षेत्रेसज्जनगड, शिवथर घळ

समर्थ रामदास


समर्थ रामदास (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र) हे महाराष्ट्रातील महान संत, कवी व समर्थ संप्रदायाचे उद्गाते होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणार्‍या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. हिंदवी स्वराज्य स्थापन करणा~या शिवाजी महाराजांनी अनेक साधू-संतांचे उपदेश घेतले असे म्हटले जात असले तरी समर्थ रामदास व शिवाजी महाराज यांचे गुरु-शिष्य नाते वेगळेच मानावे लागेल.

महाबळेश्वर (सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण)


महाबळेश्वर



सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. 
     

अजिंक्यतारा ( हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे )


                                     
                                   
                   अजिंक्यतारा 





अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

अजिंक्‍यतारा हा किल्ला सातारचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यतील आहे. सातारा शहराच्या अगदी जवळ आहे. प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्‍यतारा उभारलेला आहे. अजिंक्‍यतार्‍याची उंची साधारणत: ३०० मीटर असून ती दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटरआहे.

जाणता राजा ( 'शिवाजी महाराज' )

जाणता राजा





हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजीराजा
ही ओळ आपण ज्या नरसिंहाला उद्देशून म्हणतो ते म्हणजे 'शिवाजी महाराज'.

शिवाजी महाराज महाराष्ट्राचे 'युगपुरुष' होते. महाराष्ट्रात स्वातंत्र्याची ज्योत पेटवून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज आपल्या सर्वांनाच परिचयाचे आहेत. आपल्या भारतभूमीला नेहमीच अभिमान वाटावा, असे ते भारताचे दैवत होते

Wednesday, February 2, 2011

सज्जनगड (हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.)

 सज्जनगड
चित्रफीत:  http://www.youtube.com/watch?v=Rwz3vM0L6MY&feature=player_detailpage


चित्रफीत : 
                                   
सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
किल्ला
सज्जनगड.jpg
सज्जनगड
नावसज्जनगड (किल्ले परळी)
उंची३३५० फूट
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणसातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गावपरळी,गजवाडी
डोंगररांगसातारा
सध्याची अवस्थाचांगली

आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्व्लायनगड, अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगडनवरसतारा,अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधिव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.

अनुक्रमणिका

  •  स्थान
  •  इतिहास
  •  गडावरील ठिकाणे
  •  गडावर जाण्याच्या वाटा
  •  राहण्याची सोय

सातारा (हा लेख सातारा शहराविषयी आहे.)


सातारा  शहर



सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे.हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मी. उंचीवर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगळुर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे टिचकी द्या

सातारा
जिल्हासातारा जिल्हा
राज्यमहाराष्ट्र
लोकसंख्या(शहर) १,०८,०४८
(२००१)
क्षेत्रफळ(जिल्हा)१०,४८४ कि.मी²
दूरध्वनी संकेतांक०२१६२
टपाल संकेतांक४१५-xxx
वाहन संकेतांकMH-११
संकेतस्थळhttp://www.satara.nic.in

.

अनुक्रमणिका

  •  इतिहास
  •  भौगोलिक
    • २.१ पेठा
    • २.२ उपनगरे
  •  शैक्षणिक

]इतिहास

सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. त्यामुळे सातारा शाहूनगरी म्हणूनही ओळखले जाते.

Tuesday, February 1, 2011

सातारा जिल्हा (हा लेख सातारा जिल्ह्याविषयी आहे.)



सातारा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतात सुध्दा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

अनुक्रमणिका

  •  चतुःसीमा
  •  तालुके
  •  विशेष
  •  ऐतिहासिक महत्त्वाचे
  •  भूगोल
  •  विविध प्रकल्प
  •  प्रशासन
  •  राजकीय संरचना
  •  शेती
  • १० उद्योग
  • ११ दळणवळण
  • १२ सैनिकी शाळा
  • १३ पर्यटन
  • १४ सामाजिक / विविध बाबतीत अग्रेसर
  • १५ प्रसिद्ध/विशेष व्यक्ती
  • १६ प्रितीसंगम
  • १७ बाह्य दुवे

"आमचा महाराष्ट्र".



हा आहे "आमचा महाराष्ट्र".
इथं आशाआकांक्षाना मिळते संधी, अन् इच्छांना श्वास.
मोठे येतात मोठे जातात, पण खचत नाही कधी हिम्मत अमुची....
गरीब किंवा सधन असो जेव्हा वेळ येते, आम्ही एक होतो,
पुण्याचा निवांत असो, किंवा मुंबईची धावपळ
जो थांबत नाही, जो थकत नाही, तोच आहे माझा महाराष्ट्र
कधी गल्ल्यांमध्ये घोष होई "गणपती बाप्पा मोरया"
कधी नवरात्रींचा रास रंगत होई दांडिया
जो आला त्याला आपला केला,
दु:खी दुबळ्याला, ओलावा प्र॓माचा दिला
हाच आहे छत्रपती शिवाजीं सारख्या वीरांचा महाराष्ट्र
पोलादासारख्या निर्धाराच्या सामान्य माणसाचा महाराष्ट्र

मराठी भाषेचे वय



मराठी भाषेचे वय हे साधारण पणे १५००शे वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली असे मानले जाते. तरीही सर्वसाधारणपणे ठळक फरक खालील प्रमाणे करता येतात.

आद्यकाल

हा काल इ.स. १२०० पूर्व, म्हणजे ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या लिखाणाच्याही पूर्वीचा काल होय. या काळात विवेकसिंधु या साहित्या व्यतिरिक्त नाव घेण्यासारखी कोणतीही साहित्यकृती पाहण्यास शिल्लक राहु शकली नाही. या काळातील मराठी शब्दांचे तसेच काही वाक्यांचे उल्लेख ताम्रपटात तसेच शिलालेखात आढळतात.

महाराष्ट्राचा इतिहास



महाराष्ट्रातील विविध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.
महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.

reference: Wikipedia

मराठी भाषेचा इतिहास


मुख्यलेख मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे.[१४] भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६०[१५] मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.

भाषक प्रदेश



मराठी भाषा भारतासह मॉरीशस व इस्रायल या देशातही बोलली जाते.[४] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या महाराष्ट्रीय भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड येथेही बोलली जाते.[५]
भारतात मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मराठी बोलली जाते. मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असलेले भाग- बडोदा, सुरत, दक्षिण गुजरात व अहमदाबाद (गुजरात राज्य), बेळगांव, हुबळी- धारवाड, गुलबर्गा, बिदर, उत्तर कर्नाटक (कर्नाटक राज्य), हैद्राबाद (आंध्र प्रदेश), इंदूर, ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व तंजावर (तामिळनाडू)