आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

Tuesday, September 15, 2015

सावलीचा राजा (सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ सावली)


सावली हे सातारा  जिल्ह्यातील एक छोटेसे खेड़े, साताऱ्या पासून २० किलोमीटर अंतरावर असून परळी पासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. १५० उम्बर्त्यांच्या या गावामधे सगळे सण अगदी आनंदाने आणि एकजुटीने साजरे केले जातात. शेकडो वर्षा पूर्वीच्या या गवामधे दोन शिवलिंग आहेत जी परळी भागामधे खुप प्रसिद्ध आहेत कारण दोन शिवलिंग सहसा आढळत नाहीत.

इथे साजरा केला जाणारा एक सण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव. सावली गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १९८४ साली झाली. १९९४ साली "सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सावली" ची नोंदणी करण्यात आली.

कालांतराने या गणेशाची प्रसिद्धी होत गेली. आणि आता तो इच्यापुर्ती गणेश म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला सावलीचा राजा, नवसाचा राजा अश्या अनेक नावानी ओळखले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे कि इथे केलेला नवस पूर्ण होतो. आणि याचा प्रतेय ही खूप भक्तांनी उपभोगला आहे. आपलाही नवस पूर्ण व्हावा याच आशेने पर गावातून अनेक भाविक दर्शनाला सावली येथे येतात. सावलीकर सुद्धा त्यांच्यासाठी सगळ्या सोयी उपलब्ध करून ठेवतात. या सावलीच्या राजाला आता पर्यंत ४ गणराया अवार्ड मिळाले आहेत, त्यामधील ३ अवार्ड तालुक्यात प्रथम क्रमांकाचे आहेत. सातारा तालुका पोलीस आणि सायक्लो उद्योग समुह यांच्या संयुक्त विद्यमाने गणराया अवार्ड अंतर्गत शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे ध्येय ठेवले होते आणि सावली गावाने लागोपाठ ४ वेळा गणराया अवार्ड जिंकून त्यांच्या प्रयत्नांचे सोने केले.

सावलीकर भाविकांच्या सोयीसाठी अनेक कार्यक्रम राबवतात. सावलीच्या या राजाच्या महालात मोठ मोठे देखावे उभारले जातात. गावातीलच लहान थोर मंडळी आणि सहकारी मिळून हे देखावे बनवितात. दरवर्षी या देखाव्यातून काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न असतो. समाजप्रबोधन आणि समाजसेवा यासाठी मंडळ नेहमी प्रयत्नशील असते.



आपल्या विद्यार्थ्यांनी हे देखावे बघुन चांगल्या गोष्टी शिकाव्या या उद्देशाने आजूबाजूच्या गावातील (सायली, वेनेखोल, रोहोट) शाळांमधील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांस घेऊन गणेश मंडळास  भेट देतात.


सावलीकर येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सोयीसाठी तयार असतात. या सगळ्या कामांसाठी येणारा खर्च जास्त असला तरी तो गणरायाला येणाऱ्या देणगीतुन केला जातो. गावातील कोणाकडूनही वर्गणी घेतली जात नाही. याचा अहवाल हि दरवर्षी सदर केला जातो.

गणेश चतुर्थी दिवशी गणरायाचे अगदी वाजत गाजत आगमन होते. अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते. परगावावरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणाची उत्तम सोय असते. रात्री व्याख्यान, प्रवचन, भजन, अश्या प्रकारचे सांस्कृतिक आणि पारंपारिक कार्यक्रम असतात. आजूबाजूच्या गावातून ( कुरूळ, वडगाव, सायळी, पेट्री,)  भजन मंडळ येउन आपले कार्यक्रम सादर करतात.

अनंत चतुर्थीला सावलीच्या राजाची भव्य मिरवणूक निघते. मिरवणुकीला परागावावरूनही लोक हजेरी लावतात. मिरवणूक पारंपारिक पद्धतीने दिंडी, भजन करत निघते. मिरवणुकीत गुलाल, डॉल्बी साउंड यांचा सामावेश नसतो. सदर कार्यक्रम हा सातारा पोलिसांच्या नियमानुसार केला जातो.

तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट दया.



मंडळाने आतापर्यंत राबवलेले काही महत्वाचे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम:
१. लेक वाचवा देश वाचवा
२. एक तरी रुजावूया बी
३. अण्णा हजारे एक आदर्श व्यक्तिमत्व
४. संतांची शिकवण
फोटो: