सातारा शहर
सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यात सातारा जिल्ह्यात येते. सातारा हे नाव शहराला त्या भोवती असलेल्या सात टेकड्यांमुळे पडले आहे.हे शहर समुद्रसपाटीपासून २,३२० मी. उंचीवर कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसले आहे. हे शहर पुणे-बंगळुर महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे टिचकी द्या
| सातारा |
| जिल्हा | सातारा जिल्हा |
| राज्य | महाराष्ट्र |
| लोकसंख्या | (शहर) १,०८,०४८
(२००१) |
| क्षेत्रफळ | (जिल्हा)१०,४८४ कि.मी² |
| दूरध्वनी संकेतांक | ०२१६२ |
| टपाल संकेतांक | ४१५-xxx |
| वाहन संकेतांक | MH-११ |
| संकेतस्थळ | http://www.satara.nic.in |
.
अनुक्रमणिका- १ इतिहास
- २ भौगोलिक
- ३ शैक्षणिक
|
]इतिहास
सातारा शहर इतिहासात मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते. १७०८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा सातारा शहरात झाला. त्यानंतर मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर मराठ्यांची राजधानी होते. त्यामुळे सातारा शाहूनगरी म्हणूनही ओळखले जाते.