आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

Monday, July 11, 2011

ठोसेघर (ठोसेघरचा धबधबा)


साताऱ्यातील ठोसेघरचा धबधबा पर्यटकांना आवर्जून पावसाळ्यात आपल्याकडे ओढून घेतो. कारण स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल तर नक्कीच समजेल. अगदी तोंडातून " लई भारी" निघण्यासारखे दृश्य असते. दरवर्षी हजारो पर्यटक आवर्जून इथे येतात आणि तिथल्या निसर्गसौन्दार्याचा आनंद लुटतात. आपण हि एकदा नक्की भेट द्या.


डोंगर कपारीतून फेसाळत पडणाऱ्या छोट्या-मोठ्या धबधब्यांचे वरदान लाभलेल्या ठोसेघरला धुक्याची झालर पांघरलेली हिरवाई, कधी संथ तर कधी मुसळधार पावसात भिजपण्याचा आनंद पर्यटक लुटतात.  




 ठोसेघर धबधबा, पवनचक्क्यांचे विस्तीर्ण पठार, हिरवेगार डोंगर, सांडवली धबधबा 
पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. ते प्रशासनाने ठिकठिकाणी दिशादर्शक फलक, त्या ठिकाणाची माहिती असणारे फलक, धबधब्याकडे रेलिंग आदी उपाय योजना केल्या आहेत.                                                               




पर्यटकांचे मुख्य आकर्षन असणारा ठोसेघर धबधबा दरवर्षी जुन जुलै महिन्यात सुरु होणा-या पावसामुळे उशिरा वाहतो.परंतु यावेळी जुन महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या धबधब्याचं तांडवनृत्य आता सुरु झालं आहे.त्यामुळे गेले कित्येक दिवस उन्हाने हैराण झालेल्या पर्यंटकांनी आंगावर रोंमाच उभे करण्या-या धबधब्याचा प्रपात पाहण्यासाठी ठोसेघर धाव घेतली आहे.



संपुर्ण जिल्हा मे महिन्यात रखरखत्या उन्हात होरपळुन निघाला.जिवाची घालमेल करणारा हा उन्हाळा कधी एकदा संपतोय अन् कधी पाउसधारा बरसताहेत याची जणु चातकाप्रमाणे प्रत्येकजण वाट पाहत होता.परंतु यावेळी वेळेत पावसाचे आगमन झाले.पाहिल्याच पावसानं धो धो बरसुन जीवसृष्टी तृप्त केलं.गेली कित्येक दिवस ओसाढ पडलेले नदी नाले अगदी तुडुंब भरुन वाहु लागले आहेत तर निसर्गानेदेखील आपल रुप हळुहळु बदलण्यास सुरुवात केली आहे.चोहुकडे गर्द हिरवळ पसरली आहे.जिल्ह्याचे पर्यटनस्थळ म्हणुन ओळखला जाणारा ठोसेघर धबधबा यापासुन अलिस कसा राहणार ? धो धो कोसळणा-या या धबधब्याचं मनोहरी रुप पाहण्यासपर्यंटकांची झुबंड उडत आहे.


खळखळ वाहणा-या पांढ-या शुभ्र पाण्यात पोहण्यासाठी पर्यंटकांची संख्या वाढत आहे.विस्तीर्ण अशा झाडाझुडपातुन वाट काढत वाहणारा हा धबधबा पाहण्यासाठी येणा-या पर्यंटकांचे जुलै महिन्याच्या सुरुवातीला आगमन होते परतुं या वेळी जुन महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसाने पर्यटक मोठ्या संख्येने धबधबा पाहण्य़ास येत आहेत.

आगदी थोरपासून ते वयोवृध्दोंपर्य़ंत सारेजण ही धबधबा अन् येथील नैसर्गिक सौदर्यं आणि खळखळ वाहणा-या पाण्याचा आणंद मनमोकळ्या पणापणे लुटत आहे.तरुनाई साठी ठोसेघर धबधबा एक पिंकनिक पोईँट बनला आहे.उन्हाने हैराण झालेले पर्यटक निसर्ग सौदर्याचा पुरेसा आणंद घेत आहेत,त्यामुळे तेथे येणा-या पत्येक पर्यंटकांडुन उत्साह भरभरुन वाहत आहे.

या ठिकाणी भेट देणा-या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.यापुर्वी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.त्यांमुळे पर्यटकांच्या सुरक्षित पणे निसर्गाचा आणंद लुटता यावा,यासाठी गॅलरी बांधण्यात आली आहे.ठिकठिकाणी सुचना फलक लावण्यात आहेत.पर्यटकांना पावसाचा आणंद घेत असताना त्यांना चहा नाष्टा तसेच घरगुती पदार्थांचे जेवण या ठिकाणी मिळते.



गेल्या दोन ते तीन वर्षाच्या तुलनेने यावेळी जिल्ह्य़ात लवकर सुरु झालेल्या पावसाने पर्यंटक मोठ्या संख्येने ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी येत आहेत.

5 comments:

  1. mastch aahe re............

    naad nahi karaycha.... sataryacha.... :D

    ReplyDelete
  2. ठोसेघर (ठोसेघरचा धबधबा) कोणत्या ठिकाणी आहे व तेथे पोहोचण्याचे मार्ग सांगीतल्यास मार्गदर्षक होईल

    ReplyDelete
  3. 24.04.2014

    नमस्कार,

    आपल्या ब्लॉग वरील ठोसेघर फोटो नं. 2 आम्हाला ठोसेघर च्या नव्या बुक वर छापायची मनिषा आहे.
    कृपया आपल्या परवानागीबबत कळवावे...

    धन्यवाद

    धीरज वाटेकर
    dheerajwatekar@gmail.com

    ReplyDelete
  4. 24.04.2014

    नमस्कार,

    आपल्या ब्लॉग वरील ठोसेघर फोटो नं. 2 आम्हाला ठोसेघर च्या नव्या बुक वर छापायची मनिषा आहे.
    कृपया आपल्या परवानागीबबत कळवावे...

    धन्यवाद

    धीरज वाटेकर
    dheerajwatekar@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. जरूर उपयोग करा साहेब.

      Delete