आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

Monday, August 8, 2011

केंजळगड


केंजळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
केंजळगड
नावकेंजळगड
उंची४२६९ फूट
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणसातारा, महाराष्ट्र
जवळचे गावकोर्ले,वाई,रायरेश्वर
डोंगररांगमहाबळेश्वर
सध्याची अवस्थाव्यवस्थित


केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे.केंजळला लागुनच आहे. रायरेश्वराचे पठार.त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नवे मोठी मजेशीर आहेत. गायदर,गनेशदरा या सोप्या वाटा; परंतु कागदरा,सुणदरा,लोह्दरा,सांबरदरा,वाघदरा ह्या वाटा मात्र अवघड आहेत.केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे.सध्या तेथे शिडी लावली आहे.पूर्वी नव्हती.ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर आपल्याला ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते.'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे.पाठीमागच्या टेकडीवर गेलो,की आपण समुद्रसपाटीपासून १६९६ मीटर उंचीवर येतो.रायगडापेक्षा १ मीटर जास्त ! येथून गोलाकार नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते.

Tuesday, July 19, 2011

कल्याणगड



कल्याणगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान

पुणे - बंगळूर महामार्गावर सातारा शहर वसलेले आहे. सातारा शहराच्या पूर्वेला सह्याद्रीमधील महादेव रांगेचे एक शृंग आलेले आहे. या शृंगातच नांदगिरी ऊर्फ कल्याणगड उठावलेला आहे. पुणे ते सातारा या महामार्गाच्या पूर्वेला कल्याणगड हा किल्ला आहे. सपाट माथा असलेल्या या किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या एकमेव वटवृक्षामुळे हा किल्ला दूरूनही ओळखू येतो.

Monday, July 11, 2011

ठोसेघर (ठोसेघरचा धबधबा)


साताऱ्यातील ठोसेघरचा धबधबा पर्यटकांना आवर्जून पावसाळ्यात आपल्याकडे ओढून घेतो. कारण स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल तर नक्कीच समजेल. अगदी तोंडातून " लई भारी" निघण्यासारखे दृश्य असते. दरवर्षी हजारो पर्यटक आवर्जून इथे येतात आणि तिथल्या निसर्गसौन्दार्याचा आनंद लुटतात. आपण हि एकदा नक्की भेट द्या.


डोंगर कपारीतून फेसाळत पडणाऱ्या छोट्या-मोठ्या धबधब्यांचे वरदान लाभलेल्या ठोसेघरला धुक्याची झालर पांघरलेली हिरवाई, कधी संथ तर कधी मुसळधार पावसात भिजपण्याचा आनंद पर्यटक लुटतात.  

Friday, June 10, 2011

प्रचितगड.

संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते.




गडावर जाण्याच्या वाटा

* शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते.
* कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचितगडावर पोहोचता येते.
* नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द लागते.

सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जावे लागते. कंधार डोहाची छायाचित्रे व माहिती इंटरनेटवर असल्याने देशाच्या विविध राज्यांतून असंख्य तरुण पर्यटक हा प्रसिद्ध डोह पाहण्यासाठी येतात.


महत्वाची सुचना

चांदोली अभयारण्यातून वाट काढत जाण्यासाठी सोबत वाटाडे असणे महत्त्वाचे आहे. प्रचितगडावर चार तोफा व पडिक वास्तू असून येथील कातळाच्या तळघरात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच म्हटले पाहिजे.

कासचे पठार



खरेतर 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' म्हटले की, हिमालयातील ती'पुष्प घाटी' डोळ्यांपुढे येते. पण असेच एक पठार इथे ऐन महाराष्ट्रात साता-याजवळ या दगडधोंडय़ांच्या देशातही दडले आहे. साता-याजवळ यवतेश्वरचा घाट ओलांडत २७ किलोमीटरवर आलो की, हा कासचा तलाव आहे.

या तलावाच्या अलीकडे जांभळ्या-काळ्या कातळाचे (बेसॉल्ट-लॅटराईट रॉक) पठार पसरलेले आहे. हेच कासचे पठार. भारतातील जैववैविध्याचा एक हॉटस्पॉट! 

पुरंदर किल्ला

पुरंदर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावरसिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकाडे अदमासे २४ कि. मी. धावून भुलेश्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड वसलेला आहे. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नेऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.


पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत आसून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरुन सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

Monday, June 6, 2011

छत्रपती संभाजीराजे भोसले



लहानपण

संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरीमथुरेला ठेवले. मोंगली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

Wednesday, June 1, 2011

महाराणी ताराबाई




"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "
कवि गोविंद
मी ताराबाईबर लिहीन्याची गरज आहे का? वरच्या कवितेत तत्कालिन कवि गोविंद यांनी ताराबाईचे जे वर्णन केले आहे ते बढवुन चढवुन नाही तर त्यातील शब्दनशब्द खरा आहे. केवळ २४ ते २५ वर्षाची एक विधवा बाई, औरंगजेबासारख्या मुत्सदी सम्राटाशी लढा देन्यास उभी राहते आणि सलग साडेसात वर्षे त्याचाशी लढा देते व त्या लढ्यात स्वतः पराजित होत नाही ही घटनाच तिच्या कर्तूत्वाबद्दल सगळे काही सांगुन जाते.
मराठी स्वराज्याचे शिवाजी महाराजांनंतर तिन स्वतंत्र कालखंड आहेत. प्रत्येक कालखंडाला एक विशिष्ट महत्व आहे. येनारा प्रत्येक राजा वा राणी हे एका वेगळ्याच लढ्यातुन गेलेले आहेत. त्यांचा लढ्यातुन महाराष्ट्र तावुन सुलाखुन निघाला. प्रत्येक पुढार्याने ( संभाजी, राजाराम, ताराबाई ) अनेक कर्त्तत्ववान पुरुषांना निर्मान केले आहे. हा काळच मोठ्या धामधुमीचा होता. छत्रपती संभाजींनी औरंगजेबाला थोपवुन धरले त्यामुळे संभाजीच्या काळात औरंगजेबाला मराठा राज्य सोडुन विजापुर व गोवळकोंडा राज्य घ्यावे लागले. राजारामचा कालावधी आपण गेल्या लेखात पाहीला. आज ह्या भद्रकालीचा कालखंड पाहु.

Thursday, May 12, 2011

का मी मराठी?????




मी मराठी आहे कारन 
घरी येताना पिज्जा खाल्ला
तरी वरणभात साजुक 
तुपशिवय माझ पोट
भरत नाही...

मी मराठी आहे कारन 
कितीही ब्रान्डेड पर्फुम्स 
वापरले तरी उत्तन्या
शिवाय दिवाली साजरी होत
नाही.......

मी मराठी आहे कारन
गाडीतून जाताना जिकडे 
मंदिर दिसेल तिकडे न 
कळत हात जोडले जातात...

मी मराठी आहे कारन
मला ठेच लागल्यावर 
माझ्या तोंडातून न कळत
आई ग येत ...

माझ्यातला मराठीपन 
जोपसायचा मला अभिमान 
आहे !!!!!!

"म्हणून
मी मराठी"

"जय महाराष्ट्र "

Monday, May 2, 2011

भाऊराव पाटील


डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर, इ.स. १८८७; कुंभोज, महाराष्ट्र - ९ मे, इ.स. १९५९) हे मराठीसमाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब वर्गांमध्ये शिक्षणप्रसार करण्यासाठी 'कमवा व शिका' हे तत्त्व स्वीकारून मोठी भूमिका पार पाडली. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचेमहत्त्वाचे सदस्य होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता.


रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला.सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.

Saturday, April 2, 2011

शिखर शिंगणापूर (शंभू महादेव म्हणजे महाराष्टातील अनेकांचे कुलदैवत.)


                             
शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्टातील अनेकांचे कुलदैवत. सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर शंभू महादेवाच्या डोंगररांगेतील शिखरावर हे मंदिर प्रचीन काळा पासून प्रसिध्द आहे. देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येवून राहिला होता. त्यानेच शिंगणापुर गांव वसविले. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत. मालोजीराजे आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी एक मोठे तळे येथे बांधले, त्यास पुष्करथिर्थ असे म्हणतात. पुर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचा जिर्णोध्दार झाला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्यतज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे.

Thursday, March 31, 2011

प्रतापगड ( महाराष्ट्रातील एक किल्ला )


प्रतापगड

चित्र:Pratapgad panorama.jpg

प्रतापगड
नावप्रतापगड
उंची३५५६ फूट
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणसातारा, महाराष्ट्र
जवळचे गावमहाबळेश्वर,आंबेनळी घाट
डोंगररांगसातारा
सध्याची अवस्थाव्यवस्थित

इतिहास


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम सुरू झाले.निरा आणि कोयनानद्यांचे संरक्षण हा यामागचा मुख्य उद्देश होता .इ.स.१६५६ प्रतापगडाचे बांधकाम पूर्ण झाले. दि.१० नोव्हेंबर १६५९ रोजीशिवाजी महाराज आणिअफझलखान यांच्यात प्रतापगडाचे युध्द झाले. अफझलखान वधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खर्‍या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला.इ.स.१६५९ ते इ.स.१८१८ या प्रदीर्घ कालावधीत इ.स.१६८९ मधील काही महिन्यांचा अपवाद वगळता प्रतापगड शत्रूला कधीच मिळाला नाही.

Tuesday, March 22, 2011

छत्रपती शिवाजीराजे भोसले



छत्रपती शिवाजीराजे भोसले
छत्रपती

छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे चित्र
Shivaji Maharaj Rajmudra.jpg
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची राजमुद्रा
अधिकारकाळजून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०
राज्याभिषेकजून ६, १६७४
राज्यव्याप्तीपश्चिम महाराष्ट्र, कोकण,
सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत
आणि
उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून
दक्षिण भारतात तंजावर पर्यंत
राजधानीरायगड
पूर्ण नावशिवाजीराजे शहाजीराजे भोसले
पदव्यागोब्राह्मणप्रतिपालक
जन्मफेब्रुवारी १९, १६३०
शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यूएप्रिल ३, १६८०
रायगड
उत्तराधिकारीछत्रपती संभाजीराजे भोसले
वडीलशहाजीराजे भोसले
आईजिजाबाई
पत्नीसईबाई,
सोयराबाई,
पुतळाबाई,
काशीबाई,
सकवारबाई
संततीछत्रपती संभाजीराजे भोसले,
छत्रपती राजारामराजे भोसले
राजघराणेभोसले
राजब्रीदवाक्य'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलनहोन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)
१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.



ओळख

मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधेअनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

Monday, March 21, 2011

वासोटा (हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.)


वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

साहसाची अनुभुती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला वासोटा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे.
सह्याद्रीची मुख्यरांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वहाते. या जावळी खोर्‍यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळा पर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पुर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. एक कोकणामधून आणि दुसरा घाटमाथ्यावरुन. कोकणातील चिपळूण कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या (एस.टी.बस) गाड्या आहेत. चोरवणेपासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पुर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याची परवानगी घेवून आपण वासोट्याकडे जावू शकतो. गडावर मुक्काम करायचा असल्यास सातारा वनविभागाकडून परवानगीचे पत्र घ्यावे लागते.

Tuesday, March 15, 2011

मी मराठी




उत्तुंग भरारी घेऊ या !

उज्ज्वल भविष्यासाठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखो-यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

शिवबाची तलवार तळपली
महाराष्ट्र अस्मिता फडकली
संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली
ऋषिमुनी अन् थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले
आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले
युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी
एकदिलाने उमटू दे जयघोष आज हा ओठी
दरिखो-यातून नाद घुमू दे एकच दिनराती
मी मराठी ..... मी मराठी .....

Friday, March 11, 2011

लावणीचा परिचय.



                                
 परिचय.
मराठी वाड्मयात पोवाडे आणि लावणी यांना स्वतंत्र स्थान आहे.महानुभाव,संत,पंडित,आणि शाहिरी साहित्य, ही मराठी रथाची चार चाके,यांनी केलेली वाड्मय निर्मिती यावरच मराठी वाड्मयाचा प्रवास चालू आहे.
संताच्या भक्तिभावातून गौळणी,अभंगाची निर्मिती झाली,याच भावनेतून पुढे लावणी अवतरली.लावणीची निर्मितीमागची प्रेरणा भक्तीची होती.या भक्तिभावात स्त्री मनाची विविध रुपे प्रकट झालेली आहेत.पुरुषमनाला असलेली स्त्रीदेहाची,आणि शृंगाराची अभिलाषा काही गौळनीतुन व्यक्त होताना दिसते.हीच अभिलाषा लावणीला कारणीभूत ठरली असावी.श्रीकृष्ण,विट्ठल,पांडुरंग यांच्याविषयीचा भक्तिभाव,अभंग,यालाच जोड मिळाली ती लोकजीवनातील लोकगीतांची.लोकगीतातील प्रेमभावना म्हणजे गौळणी,विराण्या,इत्यादी रचना दिसतात.संतांनी भागवतातील श्रीकृष्णाला नायक करून या परब्रह्माला राधेची आणि गौळणीची साथ देऊन भक्तीतून श्रुंगारभाव व्यक्त केला.राधा,गौळ्णी,आणि कान्हा,यांच्या श्रुंगारक्रिडा,आणि त्याला असलेला अध्यात्माची जोड त्यामुळे तो शृंगार अध्यात्माच्या आवरणाखाली झाकला गेला.पुढे यातील अध्यात्म गेले,आणि शृंगार राहिला.यातूनच लावणीचे रूप साकार झाले असावे,श्रीकृष्ण विषयी भक्तिभाव व्यक्त करतांना शाहीरांनी गोपी-कृष्ण,यांच्या स्त्री देहाचे वर्णन करताना अनेक शृंगारिक लावण्या लिहिल्या.लावणीची निर्मिती परंपरा प्राचीन गीतात विशेष दिसते. मराठी भाषा आणि मराठी प्रदेश यांची लावणी आणि पोवाडे ही भूषणे आहेत .लावणी वाड्मय समजून घेण्यापूर्वी लावणी ही संकल्पना लक्षात घेतली पाहिजे.

लावणी (लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे)


                                 

लावणी हा महाराष्ट्रातील कलाप्रकार आहे. लावणी कित्येकदा तमाशाचा हिस्सा म्हणूनही सादर करतात. लवण म्हणजे सुंदर. लवण या शब्दावरून लावण्यगीत वा लावणी शब्द तयार झाला आहे.[१] 'लास्य' रसाचे दर्शन घडविणारी लावणी हा महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार आहे. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे. पॅरिसच्या ऑयफेल टॉवर समोर भारत महोत्सवात नृत्य समशेर माया जाधव यांनी लावणी सादर केली. त्यामुळे लावणीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त झाली. 'सुंदरा मनामध्ये भरली' हा लावणीवर आधारित कार्यक्रम अमेरिकास्थित मराठी कलावंत डॉ. मीना नेरुरकर यांनी सादर केला. त्यामुळे लावणीकडे अभिजनवर्ग वळला हे जरी खरे असले तरी गावोगावच्या जत्रांमधून, उत्सवांमधून लावणी पिढ्यान् पिढ्या जनसामान्यांचे रंजन करीत राहिली.

Friday, February 25, 2011

मी अस्सल सातारकर..







मातीत जन्मतो मी ,
मातीत रमतो मी,
मातीतच विरून शेवटी ,
मातीशी इमान राखतो मी
सातारा चा - नाद नाही करायचा...
सातारा चा - नाद नाही करायचा...
रस्त्यावर पडलं कुणी चुकून तर अजुनही लोक उचलायला धावतात,
आणि आपली कितीही सुंदर असली तरी आम्हाला साध्याच पोरी भावतात ॥

मर्दानी शस्त्र आणि मर्दानी खेळ घराघरात जपले जातात,
अरे चौकातुन तर सोडाच पण महापालिकेतही त्याची प्रात्यक्षिके होतात ॥

'हाइड-आउट' कितीही स्वस्त झालं तरी 'टपरी'वर च गर्दी असेल,
आणि मिसळच्या रश्श्यावरती पिळदार मिशी तुटून पडेल ॥

Tuesday, February 22, 2011


समर्थ रामदास स्वामी
Dasbodh.JPEG
समर्थ रामदासांचे कल्पित चित्र
मूळ नावनारायण सूर्याजी ठोसर
जन्मएप्रिल, इ.स. १६०८
जांब, जालना, महाराष्ट्र
समाधी / मृत्यूइ.स. १६८२
सज्जनगड, सातारा, महाराष्ट्र
पंथ / मतसमर्थ संप्रदाय
साहित्यरचनादासबोध , मनाचे श्लोक, करुणाष्टके , आत्माराम, अनेक स्फुट रचना
भाषामराठी
कार्यभक्ती-शक्तीचा प्रसार, जनजागृती , समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना
वडीलसूर्याजी ठोसर
आईराणूबाई
प्रसिद्ध वचनजय जय रघुवीर समर्थ
तीर्थक्षेत्रेसज्जनगड, शिवथर घळ

समर्थ रामदास


समर्थ रामदास (एप्रिल, इ.स. १६०८, जांब, महाराष्ट्र - इ.स. १६८२, सज्जनगड, महाराष्ट्र) हे महाराष्ट्रातील महान संत, कवी व समर्थ संप्रदायाचे उद्गाते होते. रामाला व हनुमंताला उपास्य मानणार्‍या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. हिंदवी स्वराज्य स्थापन करणा~या शिवाजी महाराजांनी अनेक साधू-संतांचे उपदेश घेतले असे म्हटले जात असले तरी समर्थ रामदास व शिवाजी महाराज यांचे गुरु-शिष्य नाते वेगळेच मानावे लागेल.

महाबळेश्वर (सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण)


महाबळेश्वर



सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे.