आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

Tuesday, February 1, 2011

"आमचा महाराष्ट्र".



हा आहे "आमचा महाराष्ट्र".
इथं आशाआकांक्षाना मिळते संधी, अन् इच्छांना श्वास.
मोठे येतात मोठे जातात, पण खचत नाही कधी हिम्मत अमुची....
गरीब किंवा सधन असो जेव्हा वेळ येते, आम्ही एक होतो,
पुण्याचा निवांत असो, किंवा मुंबईची धावपळ
जो थांबत नाही, जो थकत नाही, तोच आहे माझा महाराष्ट्र
कधी गल्ल्यांमध्ये घोष होई "गणपती बाप्पा मोरया"
कधी नवरात्रींचा रास रंगत होई दांडिया
जो आला त्याला आपला केला,
दु:खी दुबळ्याला, ओलावा प्र॓माचा दिला
हाच आहे छत्रपती शिवाजीं सारख्या वीरांचा महाराष्ट्र
पोलादासारख्या निर्धाराच्या सामान्य माणसाचा महाराष्ट्र



मी मराठी आहे कारण 31st december ला
दणक्यात celebration केलं तरी गुढीपाडव्याला
घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव
चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..

मी मराठी आहे कारण कॉलेज मधून येताना
टाइमपास मंचुरियन खाऊन आलो तरी
वरण भात आणि साजूक तुपाशिवाय माझं भागत नाही..

मी मराठी आहे कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर
माझे पाय थिरकले तरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात'
ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..

मी मराठी आहे कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी
संक्रांत दस-याला मानचा फ़ेटा आणि धोतर घालून,
तितक्याच उत्साहात नातेवाईकांच्या घरी जायला मला आवडतं..


"मराठा तितुका मेळवावा, महराष्ट्रधर्म वाढवावा"

पहिला मराठी बाणा - "मोडेल पण वाकणार नाही"
आता आमचा मराठी बाणा-"मी वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही "


जय भवानी ! जय शिवाजी !!


मराठीला कधीच कमी समजू नका..!

जय महाराष्ट्र..../>
करा कष्ट......./
व्हा श्रेष्ठ......./

मराठी असल्याचा गर्व आहे.............असलाच पाहिजे..

श्री द ग्रेट मराठा

2 comments: