आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

Friday, June 10, 2011

कासचे पठार



खरेतर 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' म्हटले की, हिमालयातील ती'पुष्प घाटी' डोळ्यांपुढे येते. पण असेच एक पठार इथे ऐन महाराष्ट्रात साता-याजवळ या दगडधोंडय़ांच्या देशातही दडले आहे. साता-याजवळ यवतेश्वरचा घाट ओलांडत २७ किलोमीटरवर आलो की, हा कासचा तलाव आहे.

या तलावाच्या अलीकडे जांभळ्या-काळ्या कातळाचे (बेसॉल्ट-लॅटराईट रॉक) पठार पसरलेले आहे. हेच कासचे पठार. भारतातील जैववैविध्याचा एक हॉटस्पॉट! 




साता-याच्या पाणी पुरवठय़ासाठी इथे कधी १८७५ मध्ये ब्रिटिशांनी हा तलाव बांधला. कधी दीडशे वर्षांपूर्वी या तलावातून खापरी नळ्यांवाटे सायफन पद्धतीने सुरू केलेला साता-याचा हा पाणीपुरवठा आजही सुरू आहे. या कास तलावाच्या प्रवाहातूनच उरमोडी नदीचा उगम होतो. या तलावाच्याच पुढे वजराई धबधब्यातून ही उरमोडी खाली खोल दरीत उडी घेते. अशा या कास तलावापर्यंत येताना काळावेळाचे भान सुटते.

एकीकडे घाटाईची देवराई. त्याला लागूनच धावणारा बामणोली-महाबळेश्वरचा मार्ग आणि या वाटेभोवतीच काळ्या कातळाच्या तटबंदीत पसरलेले हे कासचे पठार! बारा-साडेबाराशे मीटर उंचीवरच्या या जांभ्या पठारावर मातीचा थर फारसा नाही. मोठाले वृक्ष नाहीत. एरवी रूक्ष असे हे पठार पाऊस कोसळू लागला की, मात्र फुलांनी बहरून येते. जवळपास साडेआठशेपेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती-ऑर्किड्सचा हा फुलोरा! मान्सूनचे घनगंभीर बरसून झाल्यावर, ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला की, जणू निळी परडी पालथी व्हावी तशी ही पानफुले सडाभर सांडलेली दिसतात. निळी, जांभळी, पांढरी, लाल, गुलाबी, पिवळी अशा कित्येक रंगांची आणि नाना आकारांची..

मध्यरात्री उमलणारी, सूर्योदयी उमलणारी, थोडय़ा मिनिटांचे आयुष्य असणारी, महिना महिना राहणारी, सुगंधी असलेली, कोणताही वास नसलेली, विषारी किंवा कीटकभक्षी, सात वर्षांनी उमलणारी, फुलो-यानंतर मरून जाणारी, टिचभर टिकलीएवढी आणि डोळ्यांतही न भरणारी.. लाल, निळी, जांभळी, रंगीबेरंगी, फुलेच फुले.. आणि या फुलांनी भरलेले पठार!
कास! 

No comments:

Post a Comment